"साँचा:भारतीय जिले" के अवतरणों में अंतर

10,377 बैट्स् नीकाले गए ,  5 वर्ष पहले
छो
1.39.85.131 (Talk) के संपादनों को हटाकर सत्यम् मिश्र के आखिरी अवतर...
टैग: मोबाइल संपादन मोबाइल वेब सम्पादन
छो (1.39.85.131 (Talk) के संपादनों को हटाकर सत्यम् मिश्र के आखिरी अवतर...)
|header17= {{#if:{{{Website|}}}|[{{{Website}}} आधिकारिक जालस्थल]}}
 
}}<noinclude>{{documentation}}[[श्रेणी:ज्ञानसन्दूक]]</noinclude> . ।। थोडक्यात आपला भंडारा जिल्हा ।।
 
फक्त 7 तालुक्यांच्या ह्या जिल्ह्यात वैनगंगा ही प्रमुख नदी असून चूलबंद, बावनथडी, अंबागड, बोदलकसा, गाढवी, सूर, मरू या नद्याही जिल्ह्यातून वाहतात. हा जिल्हा तलावांचा म्हणून ओळखला जातो. अनेक तालुक्यांत छोटे-मोठे तलाव असून तुमसर तालुक्यातील चांदपूर तलाव हा जिल्ह्यात प्रसिद्ध आहे.
भंडारा जिल्हा जंगल संपत्तीच्या दृष्टीने समृद्ध आहे. सुमारे 30% क्षेत्र विविध प्रकारच्या वनांनी व्यापलेले आहे. औषधी वनस्पती व फळे, डिंक, लाख, मध, मोहाची फुले आदी वनउत्पादने येथे मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत.
खनिज संपत्तीच्या दृष्टीने भंडारा जिल्हा राज्यातील एक समृद्ध जिल्हा आहे. मँगनीज हे खनिज जिल्ह्याच्या उत्तर भागात मुबलक प्रमाणात सापडते. तुमसर तालुका मँगनीजसाठी प्रसिद्ध आहे. तुमसर व कवडसी येथे पांढरी माती मुबलक सापडते. शिवाय इतर खनिजेही जिल्ह्यात काही प्रमाणात मिळतात. मँगनीज, क्रोमाईट, क्वार्टझाईट, सिलिमनाईट, कायनाईट या खनिजांवर आधारित अनेक उद्योग भंडारा जिल्ह्यात चालतात.
 
प्रशासन:-
 
1 मे,1999, रोजी म्हणजे 1999 च्या महाराष्ट्रदिनी भंडारा जिल्ह्याचे विभाजन करण्यात येऊन गोंदिया या नव्या जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली. 1999 पासून - लाखनी या नव्या तालुक्याची निर्मिती केली गेल्याने - जिल्ह्यातील तालुक्यांची संख्या सात इतकी आहे
जिल्ह्यात लोकवस्ती असलेली एकूण ७७८ गावे आहेत.
राजकीय संरचना
लोकसभा मतदारसंघ
भंडारा, तुमसर व साकोली हे भंडारा जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघ आणि गोंदिया, तिरोडा व अर्जुनी - मोरगाव हे गोंदिया जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघ मिळून भंडारा - गोंदिया लोकसभा मतदारसंघ बनला आहे.
 
विधानसभा मतदारसंघ : -(3)
 
तुमसर, भंडारा, साकोली.
जिल्ह्यात जिल्हा परिषदेचे 52 तर पंचायत समितीचे 104 मतदारसंघ आहेत.
 
शेती:-
 
महाराष्ट्रातील तांदळाचे कोठार म्हणून भंडाऱ्याची ओळख पूर्वीपासून करून दिली जाते. राज्यात सर्वात कमी पडीक जमीन असलेला जिल्हा म्हणून भंडार्याचे नाव घेता येईल.
400 वर्षांपूर्वीपासून कोहली जमातीच्या लोकांनी पारंपरिक पध्दतीने पाणी अडवणे, जिरवणे आणि साठवण्याच्या पध्दतींनी भंडारा जिल्ह्यात वेगळीच करामत केली आहे. टेकड्यांच्या, द-या - खो-यांचा खोल भागातून भरपूर पाणी साठवल्यामुळे अनेक नैसर्गिक तळी तयार झाली आहेत. अनेक तळी मानवनिर्मितही आहेत. बहुतांश तळी आजवर टिकवून ठेवल्याने भंडारा हा तळ्यांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. एकूण सुमारे 3600 छोटे - छोटे तलाव आजही जिल्ह्यात आहेत.
प्रामुख्याने जलसिंचनासाठी जिल्ह्यातील या तलावांचा उपयोग होतो. तुमसर तालुक्यातील चांदपूर हा मोठा व महत्त्वाचा तलाव आहे. शेजारील गोंदिया जिल्ह्यातील इटियाडोह प्रकल्पातील पाणी लाखांदूर तालुक्यातील शेतीस पुरविण्यात येते. वैनगंगा व तिच्या उपनद्यांच्या काठांवर अनेक उपसा जलसिंचन योजना राबविल्या जात आहेत.
तांदूळ हे पीक घेण्यायोग्य जमीन जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर आहे. पाऊस भरपूर पडत असल्यामुळे व जलसिंचनाच्या सोयी उपलब्ध असल्यामुळे तांदळाचे पीक मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांत भात पिकवला जातो. जिल्ह्यात ऊस, तूर, सोयाबीन,ज्वारी, मूग, गहू, हरभरा, जवस ही पिके घेतली जातात. काही ठिकाणी उडदाचेही पीक घेतले जाते.
भंडारा जिल्ह्यात संपूर्ण राज्याच्या तुलनेत सर्वात अधिक जमीन ओलीताखाली येते. अनेक तलावांप्रमाणेच इंदिरासागर देखील मोठा जलाशय इथे आहे. नागपूर, चंद्रपूर आणि भंडारा जिल्ह्यातही त्यामुळे पाणी मिळते.
 
उद्योग:-
 
भंडारा जिल्ह्यात गाडेगाव व तुमसर येथे औद्योगिक वसाहती आहेत. भंडार्याजवळ जवाहरनगर येथे युद्धसाहित्य निर्मितीचा कारखाना आहे.
भंडारा जिल्ह्यातील अतिशय जुने उद्योग म्हणजे तेंदूच्या पानांपासून विड्या बनविणे आणि धातुंची भांडी बनवणे हे होत. जिल्ह्यात उपयुक्त भांडी बनवली जातातच, शिवाय भांड्यांवरील कलाकुसरही वाखाणण्याजोगी असते. जिल्ह्यातील नद्या व तळ्यांमधील मासेमारी मोठ्या प्रमाणावर चालते. जंगलांमुळे लाकूड कटाई, बांबूपासून टोपल्या व चटई इत्यादी वस्तू तयार करणे असे उद्योग चालतात.
कोसा या प्रकारचे रेशीम तयार करून कापड तयार करण्याचा व्यवसाय प्रसिध्द आहे. तांब्या, पितळ्याची भांडी तयार करणे, कौले व विटा तयार करणे, हातमागावर कापड विणणे असेही व्यवसाय चालतात. भात गिरण्या किंवा धान गिरण्या जिल्ह्यात सर्वत्र विखुरलेल्या आहेत. जिल्ह्यात मोहाडी तालुक्यात देव्हाडा येथे वैनगंगा सहकारी साखर कारखाना आहे. तुमसर रोड येथे कागद निर्मिती कारखाना आहे.
मँगनीज शुध्दीकरण, पोलाद उद्योग असे महत्त्वाचे उद्योगही जिल्ह्यात चालतात. गेल्या दशकात पोलाद उद्योगासाठी मोठ्या कंपन्या जिल्ह्यात स्थापन झाल्या आहेत.