राष्ट्रीय मतदार दिन

मतदार दिनाच्या कार्यक्रमात उपस्थित असलेल्या 18 वर्षे वयाच्या वरील सर्व मतदारांना व नागरिकांना पुढील प्रमाणे शपथ दिली जाईल. ‘†Ö´Æüß, भारताचे नागरिक, लोकशाहीवर निष्ठा ठेवून, याद्वारे, प्रतिज्ञा करतो की, आपल्या देशाच्या लोकशाही परंपरेचे जतन करु आणि मुक्त, निष्पक्षपाती व शांततापूर्ण वातावरणातील निवडणुकांचे पावित्र्य राखू व प्रत्येक निवडणुकीत निर्भयपणे तसेच धर्म, वंश, जात, समाज, भाषा यांच्या विचारांच्या प्रभावाखाली न येता किंवा कोणत्याही प्रलोभनास बळी न पडता मतदान ú¹ý.’


भारत हा लोकशाही प्रधान देश आहे. भारताची राज्यघटना लिखीत आहे. भारतीयांनी राज्यघटनेला मान्यता देऊन कायद्यान्वये तिचा स्वीकार केलेला आहे. लोकांच्या प्रतिनिधींनी लोकांसाठी घटना बनविली पण अंतिम सत्ता लोकांच्या हाती आहे. म्हणजेच भारत हे सार्वभौम प्रजासत्ताक लोकशाही देश आहे. भारतीय राज्यघटनेच्या अध्यक्षपदी डॉ॰ राजेंद्रप्रसाद हे होते. डॉ॰ बाबासाहेब आंबेडकर हे मसुदा समितीचे अध्यक्ष होते. 26 नोव्हेंबर, 1949 रोजी घटना पूर्ण झाली. 26 जानेवारी, 1950 पासून भारताची राज्यघटना लागू झाली. घटना समितीने 9 डिसेंबर, 1946 पासून आपले कार्य सुरु केले होते. 26 नोव्हेंबर, 1949 रोजी त्यावर डॉ॰ राजेंद्रप्रसाद यांनी स्वाक्षरी केली. भारतीय राज्यघटनेच्या उद्देशपत्रिकेमध्ये (प्रिऍ़म्बल) घटनेचे सार आहे. न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुता, व्यक्तीची प्रतिष्ठा या शब्दांनी राजकीय स्वातंत्र्यासह सामाजिक आणि आर्थिक लोकशाहीची घोषणा करण्यात आली आहे. देशाला स्वातंत्र्य मिळावे यासाठी सर्व जाती धर्माचे लोक ब्रिटीशांविरुध्द लढले. अनेक ज्ञात-अज्ञात देशभक्तांनी प्राणांची आहुती दिली. यातना सहन केल्या. या सर्वांचे स्वप्न साकार व्हावे, यासाठी भारतीय राज्यघटना तयार करण्यात आली. वंश, धर्म, भाषा यामध्ये विविधता असली आम्ही सर्व एक आहोत अशी भावना देशवासियांमध्ये राहील, असे घटनाकारांना वाटत होते. स्वातंत्र्यासाठी ‘‹ú’ झालेले देशबांधव आज संकुचित भावनेने वागतांना दिसत आहेत. ग्रामपंचायत, नगरपालिका, जिल्हा परिषद, विधानसभा, लोकसभा यासारख्या निवडणुकांमध्ये दिसणारे चित्र त्याचेच द्योतक नाही का ? राष्ट्रीय एकात्मतेसाठी, लोकशाही बळकटीकरणासाठी केवळ कायदे करुन उपयोग नाही. परस्पर प्रेम, बंधुबाव, आपुलकी, सहकार्याची वृत्ती प्रत्येक भारतीयांमध्ये निर्माण व्हायला हवी. घटनेने दिलेले हक्क, अधिकारांविषयी बोलतांना आपण घटनेला अपेक्षित असलेले कर्तव्य कितपत पार पाडतो याविषयी आत्मपरीक्षण करायला हवे. भारतात दर पाच वर्षांनी सार्वत्रिक निवडणुका होत असतात. ‘‹úÖ व्यक्तीस, एक ´ÖŸÖ’ या तत्वानुसार प्रौढ स्त्री-पुरुष मतदान करु शकतात. म्हणजे लोकनियुक्त सरकार स्थापनेमध्ये लोकांचा सहभाग असतो. लोकांचे लोकशाहीतील महत्त्व लक्षात घेऊनच भारत निवडणूक आयोगाने 25 जानेवारी, हा दिवस ‘¸üÖ™ÒüßµÖ मतदार פü­Ö’ (नॅशनल व्होटर्स डे) म्हणून साजरा करण्याचे निश्चित केले आहे. त्यानिमित्त सर्व मतदान केंद्राच्या ठिकाणी मतदार नोंदणी अधिकारी व जिल्हाधिकारी यांच्या स्तरावर कार्यक्रम घेण्यात येणार आहेत. देशात लोकसभा तसेच त्यानंतर महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकांमध्ये मतदानाचे प्रमाण अपेक्षेपेक्षा कमी असते. मतदानाच्या दिवशी सुट्टी जाहीर झालेली असते. तिचा सदुपयोग मतदानाचा हक्क बजावण्यासाठी न करता पर्यटनस्थळी सहलीला जाण्यासाठी केला जातो. मतदार यादीत नांव नोंदवण्याबरोबरच मतदारांनी मताचा राष्ट्रीय हक्क बजावावा, यासाठी निवडणूक आयोगाकडून त्यावेळी व्यापक जनजागरण मोहीम राबविली गेली. मतदानाचे राष्ट्रीय कर्तव्य पार न पाडता सत्तेत आलेल्या शासनाला नावे ठेवण्याचा नैतिक अधिकार खरे तर या लोकांना नसतो. पण काय करणार लोकशाही आहे ना, विचारस्वातंत्र्यामुळे त्यांना मत मांडण्याचा अधिकार असतो. राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त नव्याने नोंदणी झालेल्या सर्व मतदारांना मतदान केंद्राच्या ठिकाणी छायाचित्र ओळखपत्र (इपिक) आणि बिल्ले समारंभपूर्वक वाटप करण्यात येणार आहे. हाच या मतदार दिनाचा मुख्य हेतू आहे. राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त व्यापक स्तरावर प्रसिध्दी करण्यात येणार आहे. ग्रामीण भागात दवंडी सारख्या माध्यमाचा वापर केला जाईल. महाविद्यालयामध्ये भित्तीपत्रके (पोस्टर्स) उपलब्ध करुन दिली जातील. ही भित्तीपत्रके सूचना फलक, कॅण्टीन, वस्तीगृह इत्यादी ठिकाणी दर्शनी भागात लावण्याच्या सूचना दिल्या जातील. मतदार दिनाच्या कार्यक्रमात उपस्थित असलेल्या 18 वर्षे वयाच्या वरील सर्व मतदारांना व नागरिकांना पुढील प्रमाणे शपथ दिली जाईल. ‘†Ö´Æüß, भारताचे नागरिक, लोकशाहीवर निष्ठा ठेवून, याद्वारे, प्रतिज्ञा करतो की, आपल्या देशाच्या लोकशाही परंपरेचे जतन करु आणि मुक्त, निष्पक्षपाती व शांततापूर्ण वातावरणातील निवडणुकांचे पावित्र्य राखू व प्रत्येक निवडणुकीत निर्भयपणे तसेच धर्म, वंश, जात, समाज, भाषा यांच्या विचारांच्या प्रभावाखाली न येता किंवा कोणत्याही प्रलोभनास बळी न पडता मतदान ú¹ý.’ भारत हे धर्मनिरपेक्ष राज्य आहे. धर्मनिरपेक्ष म्हणजे निधर्मी किंवा धर्मविरोधी राज्य नव्हे तर सर्वधर्मसमभाव असा दृष्टिकोन ठेवलेले राज्य. भारताने कोणत्याही विशिष्ट धर्माचा पुरस्कार केलेला नाहीए किंवा विशिष्ट धर्मास पाठिंबा दिलेला नाहीए. असे असले तरी निवडणुकांमध्ये मतदान करताना छुप्या पध्दतीने जातीचा आधार घेतला जातो. देशाच्या एकात्मतेसाठी, एकसंधतेसाठी असा जातीवाद, धर्मवाद, प्रांतवाद याचा फार मोठा धोका आहे. मतदारांना या धोक्यापासून वेळीच सावध करावे, याकरिता ‘ मतदार नाव नोंदणी तसेच मतदानाचे महत्‍त्‍व’ या विषयावर या दिवशी माहिती देऊन मतदार जागरण केले जाणार आहे. जनतेमध्ये मतदार दिनानिमित्त जागृती निर्माण व्हावी यासाठी राष्ट्रीय सेवा योजना, राष्ट्रीय छात्र सेना, महाविद्यालयीन विद्यार्थी, स्वयंसेवी संस्थाचे प्रतिनिधी यांची प्रभात फेरी, दौड (रन फॉर व्होट), सायकल रॅली यांचे आयोजन केले जाणार आहे. पथनाट्य, लोककला, लोकनृत्य, पोस्टर्स या माध्यमांचाही वापर केला जाणार आहे. मतदान करणे हे एक राष्ट्रीय कर्तव्य आहे. ती एक सामाजिक जबाबदारी आहे. याचे भान मतदारांमध्ये निर्माण व्हायला हवे. लोकशाहीच्या बळकटीसाठी, राष्ट्रीय एकात्मतेसाठी साजरा होणाऱ्या राष्ट्रीय मतदार दिनाचा कार्यक्रम उत्साहात साजरा करा !

     राजेंद्र सरग, 
    जिल्हा माहिती अधिकारी,
                   परभणी