डंडार

(आदिवासी पारंपारिक नृत्य)

डंडार हे एक आदीवासी पारंपारिक नृत्य आहे. दिवाळिच्या सणाच्या वेळेला पुर्विच्या काळी आदिवासी क्षेत्रांच्या गावातिल काही पुरूष मनोरंजना करीता स्त्रियांसारखे साडी,किंवा लुगडे नेसुन ढोलाच्या व सुरनाई च्या तालावर नाचत होते. कुणी तिथे ढोल वाजवायचे,कुणी सोंग घेत होते उदा.वाघाचा,राक्षसाचा या सर्वप्रकाराला डंडार असे म्हनतात. नाचनारे लोक नाचायचे व बाकिचे गावकरी त्यांना पाहुन आनंदित ह्वायचे आदिवासी लोकांनी ही परंपरा आताही जपुन ठेवली आहे. आताही आदिवासी क्षेत्रातिल गावांमध्ये डंडार नृत्य करनार्या दंडारी टोळ्या येतात. डंडारित नृत्य करनारे,वाजवनारे,सोंग घेणारे सोंगाळी या सगळ्यांना "डंडारी" असे म्हणतात.

डंडार नृत्य आणि गरबा नृत्य यात फार साम्य आहे.

डंडार व गरब्यातिल साम्य
क्रमांक गरबा डंडार
1 गरबा नृत्य करनाऱ्याच्या हाथा मधे दोन काठ्या असतात डंडार नृत्य करनाऱ्याच्या हातात दोन काठ्या असतात
2 आपल्या समोरच्या व्यक्तीच्या काठीवर आपली काठी मारून हे नृत़्य केले जाते आपल्या समोरच्या व्यक्ती च्या काठीवर आपली काठी मारून हे नृत़्य केले जाते
3 गरबा नृत़्य सणांच्या दिवसात मनोरंजनासाठी केल़्या जाते ( सण-नवरात्री) डंडार नृत्य सनांच्या दिवसात मनोरंजना करिता केल्या जाते(सण-दिवाळी)